एकरकमी एफआरपीसाठी संघर्ष यात्रा; 'बळीराजा'चा एल्गार | SakalMedia<br />कऱ्हाड - उसाला एकरकमी एफआरपी अधिक सहाशे रुपये द्यावे या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटना रविवारी (ता. ७) क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या भूमीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत संघर्ष यात्रा काढणार आहे. तेथुन पायी चालत येवुन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दारात उपोषणास बसुन जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत खर्डा-भाकरी खाऊन बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत, अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी मंगळवारी दिली. (व्हिडिओ : हेमंत पवार)<br />#Karad #Sugarcane #farmer